गावरान तडका

" झक्कास वेगवेगळे पदार्थ आणि फक्कड गावरान चव "

Vada Pav Recipe in Marathi वडापाव पाककृती

वडापाव (Vadapav) हा महाराष्ट्रातील तमाम रयतेचा आवडता खाद्य पदार्थ. हजारो लोकांची रोजीरोटी बनलेला हा पदार्थ अनेकांच्या रोजच्या धावपळी मध्ये सहज पोटाची भूक शमवतो. सध्या पाच ते दहा रुपयांमध्ये रोडवर मिळणारा वडापाव मोठ्या हॉटेल्स मध्ये शंभर रुपयामध्ये देखील विकला जातो. काही वेळेस महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे मुद्दे उपस्थित करणारा हा पदार्थ कसा तयार करावा याची संपूर्ण माहिती खालील प्रमांणे.
मराठमोळ्या खमंग वडापाव ची संपूर्ण पाककृती मराठी मध्ये ( Vadapav Recipe in Marathi ).

Vadapav Recipe in Marathi

Ingredients for Vadapav recipe in Marathi (वडापाव बनविण्या साठी लागणारे साहित्य)

  • पावलादी,
  • ४ मोठे बटाटे,
  • ४ ते ५ हिरव्या मिरच्या,
  • वडे तळण्यासाठी तेल,
  • एक चमचा आले लसूण पेस्ट,
  • कोथिंबीर, कढीपत्ता, लिंबू ,
  • फोडणीसाठी – २ टिस्पून तेल, १/४ टिस्पून मोहोरी, १/४ टिस्पून जिरे, चिमूटभर हिंग, १/४ टिस्पून हळद ,
  • आवरणासाठी – १ कप चणा पिठ, ३/४ ते १ कप पाणी, १/२ टिस्पून हळद, चवीपुरते मीठ, चिमूटभर खायचा सोडा
  • चवीपुरते मीठ.

खमंग बटाटे वडे कृती (Vadapav Recipe in Marathi Procedure):-

१)  बटाटे शिजवून थंड झाल्यावर बारीक – मोठे कुस्करून घ्यावे.
२) मध्यम गॅसवर कढई गरम झाल्यावर २ चमचे तेल गरम करावे. फोडणी साठी मोहरी, जिरे, हिंग, हळद, कढीपत्ता, बारीक चिरलेल्या मिरच्या आणि नंतर आले-लसूण पेस्ट घालावी. व्यवस्थित परतल्या नंतर त्यात कुस्करलेला बटाटा घालून मंद आचेवर परतावे. चवीपुरते मीठ घालावे. सर्व मिश्रण चांगले एकजीव होईल याची दक्षता घ्यावी. शेवटी थोडा लिंबूरस घालावा. तयार झाल्यानंतर भाजी थंड होण्यासाठी ठेवावी.
३) भाजीचे छोटे गोळे करावेत आणि ते गोळे हलकेसे चपटे करावेत.
४) आवरणासाठी बेसन पिठ पाण्यात भिजवावे. त्यामध्ये अर्धा चमचा हळद, सोडा आणि चवीपुरते मिठ घालावे. पिठ अगदी पातळ किंवा अगदी घट्ट भिजवू नये.
५) कढईमध्ये वडा संपूर्ण बुडेल एवढे तेल घ्यावे. तेल व्यवस्थित तापू द्यावे. भिजवलेल्या पिठाचा एक थेंब तेलात टाकावा. जर तो टाकल्या टाकल्या वर आला तर तेल तापले आहे असे समजावे. तेल तापले कि गॅस मध्यम ठेवावा.
६) भिजवलेल्या बेसन पिठात तयार भाजीचा एक गोळा बुडवून तेलात सोडावा. असे तिन चार वडे (किंवा तळताना कढईत सुटसुटीत मावतील एवढे) हलके लालसर होई पर्यंत तळावेत. 
७) पाव मधोमध उभा कापून त्यामध्ये वडा ठेवून खाण्यास द्यावा
  • बटाटे वडे पुदिना चटणी, लसणाची चटणी, अगदी चिंचेची गोड चटणी या बरोबर गरमा गरम खूप छान लागतात. 
  • तेलामध्ये तळलेली मीठ लावून मिरची हे महाराष्ट्रातील खवय्यांचे वडापाव बरोबरचे सर्वात आवडते कॉम्बिनेशन आहे. बघा खाऊन!
आवडली का रेसिपी सांगा कंमेंट मध्ये, आणि हो शेअर करण्यास मात्र विसरू नका. 

No comments:

Post a Comment