जगातील सर्वच लोकांना चायनीज पदार्थ खायला फार आवडते. कोणाला शाकाहारी चायनीज आवडते तर कोणाला मांसाहारी. भारतामध्ये तर चायनीज खाण्याला एक विशेष महत्व आहे. भारतामध्ये शाकाहारी चायनीज पदार्थ जास्त प्रमाणात खाल्ले जातात. तसेच खूप सारे भारतीय पदार्थ चायनीज साहित्य वापरून बनवले जातात. लहान मुले चायनीज पदार्थ फार चवीने खातात. आज आपण असेच चायनीज साहित्य वापरून भारतीय पदार्थ बनवणार आहोत. ज्याचे नाव आहे चायनीज सामोसा. बटाटा आणि वाटण्याची भाजी वापरून बनवलेला सामोसा सर्वानीच खाल्ला असेल पण आज आपण तोच सामोसा चायनीज पद्धतीने बनवणार आहोत. चला तर सुरवात करूया चायनीज सामोसा (Chinese Samosa Recipe in Marathi) बनवण्यासाठी लागणाऱ्या साहित्यापासून.
Chinese Samosa Recipe in Marathi |
चायनीज सामोसा (Chinese Samosa Recipe) बनवण्यासाठी लागणारा वेळ -
Chocolate recipe in Hindi घर पे बनाएं आसान चॉकलेट रेसिपी
चायनीज सामोसा रेसिपी (Chinese Samosa Recipe in Marathi) बनवण्यासाठी लागणारे साहित्य -
आवरणासाठी साहित्य -
- २ वाटी मैदा,
- १ चमचा ओवा,
- २ चमचे गरम तेल किंवा तूप,
- चवीनुसार मीठ.
सारणासाठी साहित्य:
- २ वाटी उकळून थंड केलेले नुडलस,
- अर्धी वाटी हिरवा वाटणा,
- अर्धी वाटी किसून बारीक केलेले गाजर,
- पाव वाटी बारीक चिरलेली कांद्याची पात,
- २ चमचे आल लसून पेस्ट,
- १ चमचा सोया सॉस,
- १ चमचा ग्रीन चिल्ली सॉस,
- २ चमचे सेजवान सॉस,
- १ चमचा लाल मिरची पावडर,
- चवीनुसार मीठ,
- कोथिंबीर धुवून बारीक चिरलेली,
- १ मोठी वाटी तेल तळण्यासाठी.
Chicken Kabab Recipe in Marathi - चिकन कबाब
चायनीज सामोसा रेसिपी (Chinese Samosa Recipe in Marathi) बनवण्याची पद्धत -
सामोस्यासाठी लागणारे सारण आणि कणिक दोन्ही तयार आहे आता आपण सामोसा कसा बनवायचा ते पाहूया.
हातावर थोडेसे तेल घेऊन कणिक व्यवस्थित एकजीव करून त्याचे मध्यम आकाराचे गोळे बनून घ्या.
एक गोळी घेऊन चपाती लाटतो तशी लाटून घ्या व सुरीने मधून कापून चपातीचे दोन भाग करून घ्या. त्याच्यामध्ये सारण भरून त्याला सामोस्याचा आकार द्या.
अशाप्रकारे सर्व सामोसे तयार करून घ्या.
गैस वर कढाई मधे तेल गरम करायला ठेवा, मध्यम किंवा बारीक़ गैस वर सर्व समोसे तळून घ्या.
सामोसे मोठा गैस करून तळू नये नाहीतर थंड झाल्यावर मऊ पडतात.
अशाप्रकारे आपले स्वादिष्ट चायनीज सामोसे (Chinese Samosa) तयार आहेत.
सामोसे सेजवान चटणी किंवा टोमाटो सॉस बरोबर सर्व करावेत.
आपल्याला चायनीज सामोसा रेसिपी (Chinese Samosa Recipe in Marathi) कशी वाटली ते खाली कमेंट करून नक्की कळवा.
No comments:
Post a Comment