चिकन कबाब हा आवडीने खाल्ला जाणारा पदार्थ विशेषतः अपेटाईजर (Appetizer) म्हणजेच मुख्य जेवानाअगोदर
खाल्ला जातो. पार्टीचे नियोजन असल्यास सर्वात प्रथम चिकन कबाब ची मागणी असते.
ड्रिंक्स बरोबर अनेक लोकांचा हा अत्यंत आवडीचा पदार्थ. चलातर जाणून घेवूयात चिकन
कबाब रेसिपी मराठी मध्ये (Chicken
Kabab Recipe in Marathi) – सोप्या आणि खमंग पद्धतीनुसार.
चिकन कबाब (Chicken Kabab Recipe in Marathi) बनविण्यासाठी लागणारे साहित्य -
५०० ग्रॅम बारीक चिकन खिमा,
२ वाट्या बारीक चिरलेला कांदा,
१ वाटी बारीक चिरलेला टोमॅटो,
अर्धी वाटी बारीक चिरलेली कोथिंबीर,
१ चमचा लिंबाचा रस,
१ वाटी ब्रेड क्रम्स,
३ मोठे चमचे तेल.
चिकन कबाब (Chicken Kabab Recipe in Marathi) बनविण्यासाठी लागणारा मसाला –
२ चमचे आले लसून पेस्ट,
२ ते ३ हिरव्या मिरच्या,
१ चमचा दगड फुल,
६ ते ७ लवंगा,
१.५ इंच दालचिनी,
अर्धा चमचा जिरे.
चिकन मरीनेशन साठी लागणारे साहित्य –
१ वाटी दही,
अर्धा चमचा हळद,
अर्धा चमचा मिरची पावडर,
चवीनुसार मीठ.
चिकन कबाब (Chicken Kabab Recipe in Marathi) बनविण्याची कृती –
बारीक चिकन खिमा एका पातेल्यात घेवून त्यास मरीनेशन
साठी १ वाटी दही, अर्धा चमचा हळद, अर्धा चमचा मिरची पावडर, चवीनुसार मीठ लावून एक
तास ठेवून द्यावे.
मसाल्यासाठी २ ते ३ हिरव्या मिरच्या,१ चमचा दगड
फुल,६ ते ७ लवंगा, १.५ इंच दालचिनी, अर्धा चमचा जिरे मिक्सर मध्ये बारीक करून
घ्यावे.
झाकण न लावलेल्या कुकरमध्ये २ मोठे चमचे तेल गरम
करावे त्यामध्ये २ वाट्या बारीक चिरलेला कांदा सोनेरी रंगावर परतवा त्यामध्ये १ वाटी
बारीक चिरलेला टोमॅटो परतावा. कांदा आणि टोमॅटो छानपैकी एकजीव होईपर्यंत परतल्यावर
त्यामध्ये मिक्सर मध्ये बारीक केलेला मसाला घालावा. मसाला थोडावेळ भाजल्यानंतर
मिश्रणामध्ये मरीनेशन केलेला चिकनचा खिमा घालावा. मसाल्याचा खमंग सुवास येई पर्यंत
सर्व मिश्रण परतावे. आता या मिश्रणामध्ये धुतलेली चण्याची डाळ आणि थोडे पाणी घालून
कुकर झाकण लावून छानपैकी शिजवून घ्यावे.
शिजवलेल्या चिकन खिम्या मध्ये पाणी राहिले असल्यास
मंद आचेवर पाणी आटवून घ्यावे. खिमा पूर्णतः सुका होईल याची काळजी घ्या. सर्व
मिश्रण पळीने बारीक करा.
खिम्यामध्ये १ चमचा लिंबाचा रस आणि बारीक चिरलेली
कोथिंबीर घालून मिक्स करून घ्या. तयार मिश्रणाचे लिंबा एवढे गोळे घेवून त्यास कबाबचा
आकार द्या. हे कबाब ब्रेड क्रम्स मध्ये घोळवून गुलाबी रंगावर थोड्याश्या तेलामध्ये
तळून घ्यावेत.
चिकन कबाब (Chicken Kabab Recipe in
Marathi) खाण्यासाठी तयार आहेत. आवडीनुसार सॉस सोबत खाण्यासाठी घ्यावेत.
- चिकनचा खिमा छानपैकी बारीक केलेलाच विकत घ्यावा नाहीतर शिजवून तयार केलेला खिमा मिक्सर मध्ये बारीक करावा लागतो.
चिकन कबाब रेसिपी आपणांस आवडली का कमेंट करण्यास अजिबात विसरू नका. आणि आपल्या मित्र - मैत्रिणी सोबत अवश्य शेअर करा.
No comments:
Post a Comment