गावरान तडका

" झक्कास वेगवेगळे पदार्थ आणि फक्कड गावरान चव "

Palak Soup Recipe in Marathi (पालक सूप रेसिपी)

हिरव्या पालेभाज्यां मध्ये पालक भाजी हि सर्वात पौष्ठिक असते. मानवी शरीरामध्ये अत्यावश्यक असणारे अनेक पोषण मूल्य घटक या भाजीच्या सेवनाने मिळतात. पालक सूप ही लवकर तयार होणारी  पौष्ठिक पाककृती आहे. पालक सूप रेसिपी (Palak Soup Recipe in Marathi ) फक्त तुमच्यासाठी.


Palak Soup Recipe in Marathi


पालक सूप रेसिपी (Palak Soup Recipe) साहित्य :-


एक मोठी पालक भाजी ची जुडी अंदाजे १५ ते २० पाने,
५ ते ६ पुदिन्याची पाने,
५ ते ६ पाकळ्या लसूण बारीक ठेचून घेतलेला,
२ बारीक वाटलेल्या हिरव्या मिरच्या,
एक लहान बारीक चिरलेला कांदा,
दालचिनी पावडर, मिरपूड,
अमूल बटर, अमूल क्रीम,
चवीपुरते मीठ.

पालक सूप रेसिपी (Palak Soup Recipe) कृती :-


१) पालक भाजी निवडून घ्यावी. सर्व पालक भाजी व्यवस्तीत धुवून घ्यावी.
२) मोठ्या भांड्यामध्ये पाणी उकळत ठेवावे. पाण्यामध्ये १/२ चमचा मीठ घालावे.
३) पाणी उकळल्या नंतर त्यात स्वच्छ धुतलेली पालक भाजी आणि ५ ते ६ पुदिन्याची पाने २-४ मिनिटे उकळवावे.
४) उकळलेली पालक भाजी चाळणीत काढून त्यावर थंड पाणी घालावे. पाणी निथळून टाकावे.
५) पालक भाजीची बारीक प्युरी करावी.
६) गॅस वर कढई ठेवून कढई तापल्यावर गॅस मध्यम करावा.
७) कढईत दोन चमचे अमूल बटर टाकावे त्यामध्ये गुलाबी रंगावर ठेचलेला लसूण परतावा.
८) लसणाचा रंग किंचित गुलाबी झाला कि बारीक चिरलेला कांदा लालसर होई पर्यंत परतावा.
९) कांदा लालसर परतल्यावर त्यामध्ये पालक भाजीची प्युरी घालावी. अर्धा कप पाणी घालावे.
१०) वाटलेली मिरची, दालचिनी आणि मिरपूड टाकून मिश्रण मिक्स करावे. चवीनुसार मीठ घालावे.
११) मिश्रणास चार ते पाच मिनिटा मध्ये उकळी आली कि गॅस बंद करावा. पौष्टिक चविष्ठ पालक सूप तयार आहे.
१२) सूप बाउल मध्ये सर्व्ह करावे. सजावटीसाठी वरून अमूल क्रीम आकर्षक पद्धतीने टाकावी.

  • पालक भाजी उकळताना भांड्यावर झाकण ठेवू नये, सूप काळपट रंगाचे होते.
  • पालक सूप  मध्ये गोडसर चवीसाठी ५ ते ६ काजू ची पेस्ट घालावी छान चवी बरोबर पौष्ठिकताही वाढते.
  • आजारपणामध्ये व लहान थोरांसाठी दररोज सकाळची हि पौष्ठिक न्याहारी शरीर बलवान, व बुद्धी कार्यक्षम ठेवण्यास मदत करते.


आपण सर्वजण पालक सूप न्याहारी दररोज नक्कीकरा आणि चव कशी झाली हे कंमेंट करण्यास विसरू नका.


No comments:

Post a Comment