गावरान तडका

" झक्कास वेगवेगळे पदार्थ आणि फक्कड गावरान चव "

Dam Aloo Recipe in Marathi - राजेशाही दम आलू रेसिपी

दम आलू हा उत्तर भारतामध्ये लोकप्रिय असणारी खास पाककृती. विशेषतः अचानक पाहुणे घरी आले असता त्यांच्या आदरसत्कार युक्त जेवणावळी साठी लाखो गृहिणींची सोपी आणि सहज बनणारी परंतु राजेशाही पाककृती. या पाककृती साठी लागणारे सर्व साहित्य घरामध्ये उपलब्ध असतेच असते. चलातर मग पाहूयात सहज सोपी राजेशाही दम आलू रेसिपी मराठी मध्ये (Dam Aloo Recipe in Marathi)- 
Dam Aloo Recipe in Marathi
   

दम आलू (Dam Aloo Recipe in Marathi) बनविण्यासाठी लागणारे साहित्य :-

§  छोट्या आकाराचे अर्धा किलो बटाटे
§  एक मध्यम आकराचा बारीक चिरलेला कांदा
§  एक वाटी दही
§  ४ चमचे तेल
§  एक कप दुध
§  चीमुठभर हिंग
§  एक चमचा बारीक वाटलेली हिरवी मिरची
§  एक चमचा मिरची पूड
§  ४ ते ५ तमालपत्राची पाने
§  एक चमचा आले – लसून पेस्ट
§  चवीनुसार मीठ

दम आलू (Dam Aloo Recipe in Marathi)साठी मसाला तयार करण्यासाठी लागणारे साहित्य :-

§  एक बारीक चमचा शहाजिरे
§  ७ ते ८ मिरे
§  २ वेलदोडे
§  एक बारीक चमचा धने पूड
§  ४ ते ५ लवंगा
§  आणि एक लहान दालचिनी

दम आलू (Dam Aloo Recipe in Marathi) तयार करण्याची कृती खालीलप्रमाणे :- 

सर्वात प्रथम दम आलू तयार करण्यासाठी लागणारा मसाला तयार करून घ्या. त्यासाठी लागणारे साहित्य म्हणजे दोन वेलदोडे ,७ टे ८ मिरे, एक चमचा धने ,अर्धा चमचा शहाजिरे ,एक लहान दालचिनी आणि ४ ते ५ लवंगा हे सर्व मिक्सर मध्ये बारीक करून घ्या. मसाला मिक्सर मध्ये तयार करून बाजूला काढून ठेवा.
छोटया आकाराचे बटाटे घेऊन ते स्वच्छ धवून साफ करून घ्या. आणि तुमच्या शक्यतेनुसार कुकरमध्ये किवा पातेल्यामध्ये उकडून घ्या. बटाटे उकडून घेताना काळजी घ्या बटाटे जास्त शिजवले जावू नयेत. बटाटे बेताचे उकडून घ्यावेत. बटाटे नीट शिजवून घेतल्यानंतर त्याची साल काढून घ्या.
कढईमध्ये तेल तापवत ठेवा. तेल व्यवस्तीत तापले की बटाटे तेलामध्ये तळुन घ्या.त्यानंतर कढईतील थोडे तेल कमी करा. दोन चमचा तेल कढई मध्ये राहू द्या. त्या तेलामध्ये बारीक चिरलेले कांदा घालून व्यवस्तीत परतून घ्या. त्याचबरोबर हिंग, तमालपत्र आणि आल-लसून पेस्ट टाकून सर्व मिश्रण नीट हलवून एकत्रित करून घ्या. सर्व मिश्रण लालसर रंगाचे होई पर्यंत परतून घ्या. मिश्रण व्यवस्तीत परतले गेले की त्याला बाजूने तेल सुटू लागते.
मिश्रण व्यवस्तीत परतले गेले की त्यामध्ये मिक्सरमध्ये बारीक केलेला मसाला टाका. मसाला टाकल्यानंतर गॅस मंद आचेवर करून २ ते ३ मिनिटे मिश्रण झाकण लावून ठेवा. त्यानंतर हळद,मिरची पावडर आणि चवीनुसार मीठ घालून मिश्रण पुन्हा एकदा व्यवस्तीत हलवून परतून घ्या. तेल सुटायला लागले की गॅस थोडासा मोठा करून त्यामध्ये दही आणि दुध घालून मिश्रण घोटून घ्या. जर मिश्रण घट्ट झाले असले तर थोडेसे पाणी उकळून घ्या आणि ते पाणी टाकून मिश्रण ढवळून घ्या.
सर्वात शेवटी तळलेले बटाटे घालून परतून घ्या. मसाला सर्व बटाटयांना लागला पाहिजे याची  काळजी घेवून बटाटे मासाल्यामध्ये परतून घ्या. त्यानंतर गॅस बंद करून भाजीला चांगल्या दोन वाफा येऊ द्या.
तुमच्या आवडीनुसार तुम्ही सजावटीसाठी भाजीवर बारीक चिरलेली कोथिंबीर टाकू शकता. अशा प्रकारे गरमागरम दम आलू (Dam Aloo Recipe in Marathi) तयार आहे.

गरम गरम दम आलू तंदूर रोटी बरोबर हे ढाबा स्टाईल कॉम्बिनेशन माझे जाम आवडते आहे. आपली आवड काय आहे खाली कमेंट करून सांगायला विसरू नका.

No comments:

Post a Comment