गावरान तडका

" झक्कास वेगवेगळे पदार्थ आणि फक्कड गावरान चव "

Besan Ladoo Recipe In Marathi चविष्ठ बेसन लाडू पाककृती

बेसन लाडू हा दिवाळी सणाच्या पदार्था मधील एक चविष्ठ गोड पदार्थ. बनविण्यास अतिशय सोपा आणि कमीतकमी वेळेत तयार होणारा बेसनाचा लाडू, तितक्याच कमी वेळेत कधी संपतो हे आईला देखील कळत नाही. दिवाळी सणाच्या पदार्थांच्या रेलचेलीतला बेसनाचा लाडू इतर वेळी देखील लहानग्यांचा हट्ट पुरवतो. काजू – बदामाचे काप, बेदाणे, आणि पिवळे मनुके या बेसनाच्या लाडूना चविष्ठ आणि पौष्ठिक बनवतात.  
तर मग ही छानशी बेसन लाडू पाककृती (Besan ladoo recipe in Marathi) फक्त तुमच्यासाठी.......

Besan Ladoo Recipe in Marathi

बेसन लाडू  (Besan ladoo recipe) लागणारे साहित्य :-


अर्धा किलो रवाळ दळलेले हरभरा डाळीचे पीठ,
१०० ग्रॅम तूप नसल्यास डालडा चालेल,
२५० ग्रॅम  पिठीसाखर,
१ चमचा वेलची पूड,
अर्धा जायफळ पूड
२५ ग्रॅम बेदाणा
थोडे काजू – बदामाचे काप.


बेसन लाडू (Besan ladoo recipe) बनविण्याची कृती :-


१) गॅस वर कढई ठेवून कढई चांगली गरम झाल्यावर गॅस मध्यम करा. १०० ग्रॅम  तूप कढईमध्ये टाकून गरम होऊ  द्या.
२) गरम तुपामध्ये हरभरा डाळीचे रवाळ पीठ खमंग भाजून घ्या. पीठ भाजताना ते सतत हलवत राहण्याची काळजी घ्या, म्हणजे करपले जाणार नाही.
३) छान सुगंधित भाजल्यानंतर गॅस बंद करा. कढई गॅसवरून उतरून ठेवा.
४) हे मिश्रण थोडेसे कोमट झाल्यावर त्यामध्ये २५० ग्रॅम  पिठी साखर घाला व मिश्रण एकजीव करा.
५) १ चमचा वेलची आणि जायफळ यांची पूड तसेच काजूबदामाचे काप घालून मिश्रण व्यवस्थित एकजीव करा.
६) मिश्रण थोडे कोमट असतानाच मिश्रण  हाताला चिकटू नये यासाठी तुपाचा हात घेऊन छानसे लाडू वळून घ्या.
७) एका तयार बेसनाच्या लाडू वरती एक बेदाणा सजावटी साठी चिकटवा, लाडू ला एक छान लुक येईल.
८) गोड चविष्ठ बेसन लाडू खाण्यासाठी तयार आहेत.

  • आपणास आवश्यक ज्यास्त गोडीसाठी पिठीसाखर ५० ग्रॅम ने वाढवून घ्या.
  • या बेसन लाडू पाककले (Besan ladoo recipe)  मध्ये आपण ड्रायफ्रूट मध्ये पिवळे मनुके वापरू शकता छान लागतात.
  • हरभरा डाळीचे पीठ रवाळ असण्याची काळजी घ्या, नाहीतर लाडू खाताना टाळ्यास चिकटतात.

बेसन लाडूची पाककृती (Besan ladoo recipe in Marathi)  जाणून घेतलीत, लाडू बनविल्या नंतर मात्र चव कशी झाली हे आम्हाला कळविण्यास विसरू नका.


No comments:

Post a Comment