गावरान तडका

" झक्कास वेगवेगळे पदार्थ आणि फक्कड गावरान चव "

Coconut Ladoo Recipe in Marathi नारळाचे लाडू

दिवाळी सण मोठा नाही आनंदाला तोटा. दिवाळीला आनंदा बरॊबरच प्रत्येक घरांमध्ये गोड धोड पदार्थाना कधीच तोटा नसतो. प्रत्त्येक गृहिणी दिवाळीच्या अगोदर आठवडाभर दिवाळीचे पदार्थ बनवण्या मध्ये व्यस्त असते. सुगरणीच्या कलागुणांचे सम्पुर्ण दिवाळीमध्ये कौतुक होत असते. यामध्ये लाडू या राजा पदार्थाचा मोठा थाट असतो. कोकणातील  नारळाचे लाडू ( Coconut Ladoo) हे खास आकर्षण तितकेच पौष्टिक आहे.
कोकण आणि नारळ यांचे जीवाभावाचे नाते आहे. कोकणातील नारळाचे पदार्थ म्हणजे खवय्यांसाठी मोठी मेजवानीच. यामध्ये दिवाळी च्या सणाला नारळाचे लाडू (Coconut Ladoo) हा फटाफट तयार होणारा पौष्टिक गोड पदार्थ सर्वांच्याच आवडीचा. अर्ध्या तासामध्ये तयार होणारी कोकणातील खास पाककृती फक्त आपल्यासाठी.


Coconut Ladoo Recipe in Marathi


नारळाचे लाडू (Coconut Ladoo)  बनविण्यासाठी लागणारी सामग्री :-


२ मोठे नारळ
१०० ग्रॅम साखर
१/२ चमचा  वेलचीपूड
पाच – सहा काजू आणि बदाम यांचे  काप
१/२ कप दूध


नारळाचे लाडू ( Coconut Ladoo) बनविण्याची कृती:-


१) २ मोठे नारळ विळी वरती काळजी पूर्वक खवून घ्यावेत. श्यकतो वरील चॉकलेटी आवरणं येऊ देऊ नये.
२) एका पसरट भांड्यामध्ये खवलेला नारळ आणि  अर्धा कप दूध एकत्र करावे. मध्यम गॅसवर उकळत ठेवावे.
३) भांड्याच्या तळाला नारळ चिकटू नये म्हणून हळू हळू ढवळत राहावे.
४) मिश्रण घट्ट होऊ द्यावे. थोडे घट्ट झाल्यावर त्यामध्ये साखर घालून मिश्रण एकजीव करावे.
५) अर्धा चमचा वेलचीपूड आणि काजू – बदामाचे काप घालून मिश्रण घट्टसर होत आले कि गॅस बंद करावा.
६) मिश्रण थोडावेळ थंड होऊ द्यावे. नॉर्मल गरम असताना हातावर मिश्रण चिकटू नये म्हणून तूप लावावे.
७) छान छान गोल लाडू वळून घ्यावेत.
८) हे लाडू वळल्या नंतर फ्रिज मध्ये ठेवावेत. फ्रिज मध्ये ठेवलेला लाडू घट्ट होतो तर फ्रिज बाहेरील लाडू नरमसर राहतो.
९) एका तासानंतर फटाफट तयार झालेले नारळाचे लाडू (Coconut Ladoo)  खाण्यासाठी तयार आहेत.
  • आपण हे लाडू टूटीफ्रूटी, बदामाचे काप, मनुके, चारोळी, या पैकी एकाने आकर्षक पद्धतीने सजवून त्यांना एक खास लूक देऊ शकता.
  • ओल्या नारळा ऐवजी सुके खोबरे बारीक किसून दूध मिक्स करण्या अगोदर तांबूस रंगावर भाजून घेऊन त्यापासून देखील चविष्ठ लाडू तयार केले जातात. 
नारळाचे लाडू बनविल्या नंतर तयार लाडवांची चव कशी आहे हे आम्हाला सांगण्यास विसरू नका.
आपल्या प्रतिक्रियांची आम्ही वाट पाहत आहोत त्याचबरोबर चविष्ट पाककृती शेअर नक्की करा. 


No comments:

Post a Comment