जगभरातील गणेशभक्तांच्या साठी
खास मोदक रेसेपी. प्रत्येक महिन्यात येणारी संकष्टी चतुर्थी, आठवड्याचा प्रत्येक
मंगळवार, आणि वर्षातून भाद्रपद या मराठी महिन्यात घरोघरी होणारे श्री गणेशाचे आगमन
या पर्वावर गणेशाचे सर्वात आवडते मोदक ही पाककृती गणेश नैवेद्यासाठी हमखास बनवले
जाते. मोदक बनवण्याच्या अनेक पद्धती आहेत परंतु कोकण वासीयांची उकडीचे मोदक ही
पाककृती विशेष प्रसिद्ध आहे.
मोदक रेसेपी (Modak Recipe In Marathi) बनविण्यासाठी लागणारे साहित्य -
१ मोठा नारळकिसलेला गूळ
२ कप तांदूळाचे पिठ
वेलचीपूड
मिठ
तांदूळाच्या उकडीत घालण्यासाठी तेल, तूप
उकडीचे मोदक (Ukadiche Modak Recipe In Marathi) बनविण्याची कृती -
१) सारण बनवण्यासाठी प्रथम नारळ खवून घ्यावा. प्रमाणासाठी एक स्टीलची वाटी घ्यावी. जितकया वाट्या खवलेला नारळ असेल त्याच्या अर्धा किसलेला गूळ घ्यावा. (उदाहरणार्थ - २ वाटीभर नारळाचा चव त्यासाठी १ वाटी किसलेला गूळ). पातेल्यात खवलेला नारळ आणि गूळ एकत्र करून मंद आचेवर परतून घ्यावेत. गूळ वितळला कि वेलची पूड घालावी. छान पैकी परतून मिश्रण थंड होण्याकरिता बाजूला ठेवून द्यावे.२) आवरणासाठी तांदूळाची उकड करण्यासाठी जितके पिठ तितके पाणी असे प्रमाण घ्यावे. २ कप तांदूळ पिठासाठी २ कप पाणी गरजेचे असते. जाड पातेल्यात २ कप पाणी उकळवत ठेवावे. त्यात १ चमचा तेल किंवा तूप घालावे. चवीसाठी थोडे मिठ घालावे. गॅस बारीक करून पिठ घालावे. मिश्रण मोठ्या पळीच्या सहाय्याने एकजीव करावे. पिठाचे गोळे राहनार नाहीत याची काटेकोरपणे दक्षता घ्यावी. मध्यम आचेवर २ मिनीटे २ ते ३ वेळा वरती झाकण ठेवून वाफ काढावी. गॅसवरून उतरवून ५ मिनीटे झाकून ठेवावे.
३) परातीत तयार उकड काढून घ्यावी. हि उकड व्यवस्थित मळून घ्यावी लागते. त्यासाठी बाजूला वाडग्यात कोमट पाणी आणि वाटीत थोडे तेल घ्यावे. उकड मळताना तेल आणि थोडे पाणी लावून मऊसर मळून घ्यावी.
४) उकड व्यवस्थित मळून झाली कि त्याचे सुपारीपेक्षा थोडे मोठे गोळे करून त्याची पारी तयार करावी. त्यात एक चमचाभर सारण भरून बोटाने पारीच्या चुण्या कराव्यात आणि सर्व चुण्या एकत्र आणून मोदक बंद करावा.
५) जर मोदकपात्र उपलब्ध असेल तर पात्रात पाणी उकळत ठेवावे .त्यातील चाळणीत स्वच्छ धुतलेले सुती कापड ठेवून त्यावर मोदक ठेवावेत. वरून झाकण लावून १०-१२ मिनीटे वाफ काढावी.
६) जर मोदकपात्र उपलब्ध नसेल तर मोदकांना वाफवण्यासाठी उपलब्ध असलेल्या चाळणीपेक्षा मोठ्या तोंडाचे जाड बुडाचे पातेले घ्यावे. त्यात ३-४ भांडी पाणी उकळावे. मोठे भोक असलेल्या स्टीलच्या किंवा अल्युमिनीयमच्या चाळणीत स्वच्छ सुती कापड ठेवून किंवा प्लास्टीकची जाड शिट ठेवून त्यावर मोदक ठेवावेत. एकावर एक मोदक ठेवू नयेत. त्यामुळे मोदक फुटण्याचा संभव असतो. जेवढे मावतील तेवढेच मोदक ठेवावेत. पातेल्यातील पाणी उकळले की मध्यम गॅसवर पातेल्यात कूकरचा डबा ठेवावा त्यावर मोदकांची चाळण ठेवावी. पाणी मोदकांच्या तळाला स्पर्शेल एवढे असले पाहिजे. वरून झाकण ठेवून १२-१५ मिनीटे वाफ काढावी.
७) जर मोदक केल्यावर तांदूळाची उकड उरली असेल तर त्यात मिरची, मिठ, जिरे, हिंग, हळद, थोडी चिरलेली कोथिंबीर घालून मळून घ्यावी आणि त्याच्या गोल छोट्या चपट्या पुर्या करून शेवटचे मोदक वाफवताना त्यातच या निवगर्या वाफवून घ्याव्यात.
गणपती बाप्पाला नैवेद्य दाखवून साजूक तूप घालून गरमागरम मोदक खावेत.
- आवडत असल्यास सारणात काजू-बदामाचे पातळ काप घालू शकतो.
मल्टि पर्पज स्टीमर मोदक बनविण्यासाठी सर्वोत्तम
एकसारख्या आकाराचे मोदक बनविण्यासाठी मोदक साचा
२० % Discount for Gavran Tadka Readers
No comments:
Post a Comment