मकरसंक्रांत जानेवारी महिन्याच्या गुलाबी थंडीतला इंग्रजी नवीनवर्षातला पहिला सण. मराठमोळा सण म्हटलं कि सर्व विशेष गोष्टींनी परिपूर्ण असतोच असतो. तिळाचे लाडू हे या सणाची खास रेसिपी. थंडीच्या वातावरणात मानवी शरीराला बळकटी देण्यासाठी पारंपारिक पद्धतीनुसार बनवलेले चविष्ट तिळाचे लाडू आयुर्वेदानुसार प्रचंड लाभदायक. अनेक पोषणमूल्य योग्यवेळी शरीरास मिळावीत यासाठी मराठी संस्कृतीने सण साजरे करण्याची खूपच छान रचना पिढ्यानपिढ्या केलेली आणि जपली देखील आहे. यामुळेच मकरसंक्रांतीच्या पूर्वी दोन दिवस प्रत्येक मराठी घरात तिळाचे लाडू किंवा तिळाच्या वड्या बनविण्याची लगबग सुरु असताना पहायला मिळते. पाहुयात मग ही चविष्ट पौष्टिक रेसिपी कशी बनवावी.
तिळाचे लाडू (Tilache ladoo) किंवा वड्या बनविण्याचे साहित्य -
१/२ किलो पांढरे तीळ (श्यक्यतो पॉलीश न केलेले),
१/२ किलो चिक्कीचा गूळ,
१५० ग्रॅम सूख खोबरे बारीक किसलेले,
१५० ग्रॅम शेंगदाण्याचे जाडसर कुट,
१ छोटा चमचा वेलची पूड,
१ चमचा गावरान तूप.
१/२ किलो चिक्कीचा गूळ,
१५० ग्रॅम सूख खोबरे बारीक किसलेले,
१५० ग्रॅम शेंगदाण्याचे जाडसर कुट,
१ छोटा चमचा वेलची पूड,
१ चमचा गावरान तूप.
तिळाचे लाडू (Tilache ladoo) किंवा वड्या बनविण्याची कृती -
प्रथम कढईमध्ये तीळ ५ ते ७ मिनिटे मध्यम गॅस वर व्यवस्तीत भाजून घेणे.
बारीक किसलेले खोबरं देखील २ मिनिटं छान खमंग भाजून घेणे.
शेंगदाण्याचे जाडसर कूट, भाजलेले तीळ, आणि भाजलेले खोबरं किस एकत्र करून घेणे.
कढई मध्ये १ टेबलस्पून तूप तापवून त्यात चिक्कीचा गूळ घालून ५ मिनिटे मध्यम गॅस ठेऊन गूळ शिजू द्यावा.
गूळ पूर्णपणे वितळून त्याचा गोळीबंद पाक तयार झाला की गॅस बंद करावा.
गुळाच्या पाकात १ छोटा चमचा वेलची पूड घालून, त्यानंतर तीळ, खोबरं ,शेंगदाण्याचं कुट ह्याचे मिश्रण घालावे.
सर्व मिश्रण छानपैकी एकजीव करावे. मिश्रण गरम असतानाच त्याचे लहान लहान लाडू तयार करावेत.
वड्या करायच्या असल्यास मिश्रण एका परातीला किंचित तुपाचा हात देऊन (वड्या चिकटू नयेत म्हणून) पसरवून दाबून एकसारखे प्लेन करून घ्यावे. सूरी अथवा शंकरपाळीच्या फिरकीने हव्यात्या आकाराच्या वड्या पाडून घ्याव्यात. मिश्रण दोन ते तीन तास थंड झाले कि वड्या अलग करता येतात.
- आपल्या आवडीनुसार लाडू मध्ये सुकामेवा म्हणजेच काजू,बदाम यांचे काप घालू शकतो.
- पांढरे तीळ श्यक्यतो पॉलीश न केलेलेच घ्यावेत चवीलाही आणि पौष्टिकतेलाही चांगले असते.
छानपैकी चविष्ट तिळाचे लाडू किंवा वड्या तयार झालेल्या आहेत. आपण देखील बनवा. चव कशी झाली हे मात्र प्रतिक्रिया मध्ये सांगण्यास अजिबात विसरू नका.
No comments:
Post a Comment