गावरान तडका

" झक्कास वेगवेगळे पदार्थ आणि फक्कड गावरान चव "

Samosa Recipe in Marathi खुसखुशीत सामोसे पाककृती

सामोसा भारताच्या बहुतेक ठिकाणी मिठाई च्या दुकानांमध्ये विक्रीस असणारा एक लोकप्रिय पदार्थ. पारंपारिक मटार आणि बटाटे यांच्या नैसर्गिक स्वादाने परिपूर्ण असणारा हा सामोसा मात्र चटपटीत चटण्याबरोबर खाण्याची मजा निराळीच. आजकाल सामोसा विविध प्रकारानं बनवला जातो आणि तितक्याच आवडीने खाल्ला देखील जातो. रिमझिम पडणाऱ्या पावसाकडे पहात गरमागरम सामोसे खाणे हा अनुभव एकदा घेऊनच बघा. चला तर पाहुयात खुसखुशीत सामोसे कसे तयार करावेत.  

Samosa Recipe In Marathi

सामोसा (Samosa Recipe) तयार करण्यासाठी लागणारे साहित्य खालील प्रमाणे :-


१) अर्धा किलो मटारचे दाने
२) पाव किलो फ्लॉवर
३) एक कोथिंबीरची जुडी
४) एक छोटे लिंबू
५) ७ ते ८ हिरव्या मिरच्या
६) ८ ते ९ लसणाच्या पाकळ्या
७)  जिरे पूड एक टीस्पून
८)  धने पूड एक टीस्पून
९) एक चमचा लाल तिखट
१०) एक टीस्पून हळद
११) चवीपुरते मीठ
१२) थोडीशी साखर
१३) एक टीस्पून पांढरे तीळ
१५) १२५ ग्रॅम मैदा
१६) अर्धा किलो बटाटे
१७) आणि सामोसा (Samosa) तळण्यासाठी तेल

सामोसा (Samosa Recipe In Marathi ) तयार करण्याची कृती खालील प्रमाणे :-


सर्व प्रथम मटार आणि बटाटे कुकरमध्ये तुमच्या अंदाजानुसार चांगले शिजुवून घ्या. मटार आणि बटाटे शिजत घालून सामोस्यासाठी मैदाचे पीठ तयार करायला घ्या. तुमच्या आवशक्यतेनुसार मैदा घेऊन त्यामध्ये लाल तिखट,एक टीस्पून धने पूड, एक टीस्पून जिरे पूड, एक टीस्पून हळद, थोडीशी हिंग, भाजलेले तीळ, बारीक चिरलेली कोथिंबीर आणि चवीपुरते मीठ टाका. त्याचबरोबर त्यामध्ये अर्धी वाटी तेल टाका आणि हे सर्व मिश्रण चांगले एकजीव करून घट्ट मळून घ्या. मैदाचे पीठ चांगले मळून झाले की दोन तास ते पीठ मुरत ठेवा.
तोपर्यंत बटाटे आणि मटार शिजून थंड झाले असतील. बटाटे सोलून सगळे बटाटे एकसारखे बारीक करून घ्या म्हणजेच कुस्करून घ्या. त्याचबरोबर फ्लॉवर निवडून बारीक चिरून घ्या.त्यानंतर मटार, कुस्करलेला बटाटा, बारीक चिरलेला कांदा, लसून,७ ते ८ हिरव्या मिरच्या, बारीक चिरलेली कोथिंबीर, बारीक चिरलेला फ्लॉवर तसेच थोडं लाल तिखट, एक टीस्पून हळद, थोडीशी हिंग, एक टीस्पून धने पूड आणि चवीपुरते मीठ टाकून संपूर्ण मिश्रण एकजीव करून घ्या. त्याचबरोबर ह्या मिश्रणामध्ये लिंबाचा रस घालून मिश्रण एकत्र करून घ्या.
त्यानंतर मैदयाचे पीठ चांगले भिजले असेल तर आता सामोसा(Samosa) तयार करायला घ्या. त्यानंतर मैद्याचा एक छोटा गोळा घेवून सर्वात प्रथम त्याची एक पातळ आणि मोठी अशी पोळी तयार करा. जास्तही पातळ करू नका. लाटलेल्या पोळीचे तीन एकसारखे भाग करून घ्या. त्यानंतर तीन पट्यांवर तयार केलेले बटाटा आणि मटारचे मिश्रण एकसारखे सगळीकडे मिश्रण घालून घ्या. मिश्रण घातल्यानंतर मग त्याची खणासारखी त्रिकोणी घडी घाला. अशा प्रकारे सर्व सामोसे तयार करून घ्या. सर्व सामोसे तयार केल्यानंतर कढई मध्ये तेल टाकून सगळे सामोसे चांगले गुलाबी रंग येई पर्यंत मध्यम आचेवर तेलामध्ये तळून घ्या. अशा प्रकारे गरमागरम सामोसे (samose) तयार होतील.तुमच्या आवडीनुसार कोरडेच किंवा सॉस बरोबर खायला घ्या.


सामोसा बरोबरच वडापाव हा भारतातील सुप्रसिद्ध सर्वाधिक खाल्ला जाणारा पदार्थ आहे. जाणून घ्या वडापाव ची अस्सल मराठी पाककृती – Vadapav Recipe



काही महत्वाचे सामोसा पाककृती  (Samosa Recipe In Marathi) –

  • मैदा आणि इतर मिश्रण तेला मध्ये मळून घेतल्याने सामोसे खुसखुशीत होतात.
  • सामोसे पुदिन्याच्या हिरव्या चटणी बरोबर हे गुजराती बांधवांचे आवडते कॉम्बिनेशन आहे.
  • सामोसे चिंचेच्या आंबट गोड चटणी बरोबर हे राजस्थानी बांधवांचे आवडते कॉम्बिनेशन आहे.
  • सामोसा आणि चटणी बरोबर बारीक शेव हे भारतातील सर्व स्ट्रीट फूड मधील सर्वाधिक खाल्लं जाणारे कॉम्बिनेशन आहे.
सामोसा पाककृती (Samosa Recipe In Marathi) बनविल्या नंतर मात्र चव कशी झाली हे आम्हाला कळविण्यास विसरू नका. आपली प्रतिक्रिया चांगल्या recipies आपणांपर्यंत पोहोचविण्यास खूप महत्वाच्या असतात.

No comments:

Post a Comment