गावरान तडका

" झक्कास वेगवेगळे पदार्थ आणि फक्कड गावरान चव "

Narali Bhat Recipe in Marathi नारळी भात

नारळी भात (Narali Bhat) हा खासकरून नारळीपौर्णिमेला बनविला जाणारा कोकण महाराष्ट्रातील महत्वाचा पौष्टिक पदार्थ. नारळाचे विविध पदार्थ अस्सल कोकणी पद्धतीने बनविल्यास अप्रतिम चवीचे तर असतातच पण तितकेच आरोग्यपूर्ण देखील असतात. श्रावणातील पौर्णिमेस नारळीपौर्णिमा देखील म्हणतात. आयुष्यभर समुद्रावर गुजराण करणारे कोळी बांधव या दिवशी समुद्रदेवतेस भावभक्तीने नारळ अर्पण करतात. याच बरोबर सर्व घरांमध्ये नारळी भात नैवेद्य म्हणून बनविला जातो. 
पाहुयात चविष्ट नारळी भाताची पारंपारिक पाककृती Narali Bhat Recipe in Marathi :- 

Narali Bhat Recipe in Marathi


नारळी भात बनविण्यासाठी लागणारे साहित्य :- 

२ कप तांदूळ,२ कप पाणी,२ मोठे चमचे साजूक तूप४ लवंगा, ४ ते ५ मिरे, वेलची पूड,१ कप किसलेला गूळ,१ कप ताजा खोवलेला नारळतुपात तळलेले काजू, मनुके. 


नारळी भात बनविण्याची पाककृती (Narali Bhat Recipe in Marathi) :-


१) तांदूळ धुवून निथळण्यास ठेवावेत.
२) मोकळ्या कुकर मध्ये १ मोठा चमचा तूप गरम करावे. लवंग आणि मिरे घालून काही क्षण परतावे. निथळलेले तांदूळ घालून २-३ मिनीटे मध्यम आचेवर परतावे.
३) श्यक्यतो २ कप गरम पाणी परतलेल्या तांदूळात घालावे. कुकर चे झाकण लावून मध्यम आचेवर भात शिजवावा. २ कुकर च्या शिट्या झाल्यावर गॅस बंद करून ५ मिनिटानंतर कुकर उघडावा. शिजलेला भात हलक्या हाताने एका प्लेट मध्ये काढून मोकळा करावा. शिते मोडणार नाहीत याची खबरदारी घ्यावी.
४) नारळ आणि गूळ एकत्र मिक्स करून भात गार झाला कि हे मिश्रण भातात अगदी हलक्या हाताने मिक्स करावे.
५) मोकळ्या कुकर मध्ये १ मोठा चमचा तूप गरम करून भात-नारळ-गूळ यांचे मिश्रण घालावे. थोडी वेलचीपूड घालावी. कुकर चे झाकण लावून मध्यम आचेवर २ ते ३ शिट्या कराव्यात. ३ शीट्यानंतर १० मिनिटांनी कुकर उघडावा. 
६) कुकर उघडल्यावर अर्धाचमचा तूप, तळलेले काजू, मनुके घालून मंद आचेवर २ ते ३ मिनिटे परतावे. जेणेकरून भाताचा ओलसर पणा कमी होईल.

७) नॉर्मल थंड झाल्यावर नारळी भात खाण्यास तयार आहे.   

नारळी भात पाककृती (Narali Bhat Recipe in Marathi) मध्ये काही महत्वाचे:- 

  • आपणास आवश्यक गोडी नुसार गुळाचे प्रमाण कमी ज्यास्त करा. 
  • पाहिल्यावेळेस भात शिजवताना तो नॉर्मल कच्चा राहिला तरी चालेल परंतु गूळ आणि खोबरे यांचे मिश्रण घातल्या नंतर मात्र भात व्यवस्थित शिजेल याची दक्षता घ्या.
  • नारळी भातासाठी सुगंधी बासमती तांदूळ वापरणे अतिशय उत्तम नसल्यास चिकट न होणारा / मोकळा भात होणारा तांदूळ निवडावा.  
पौष्टिकतेने समृद्ध असणारी नारळी भाताची पाककृती नक्की बनवा. मात्र चव कळविण्यास आणि शेअर करण्यास विसरू नका. 


No comments:

Post a Comment