गावरान तडका

" झक्कास वेगवेगळे पदार्थ आणि फक्कड गावरान चव "

Bharli Vangi recipe in Marathi खमंग भरली वांगी

खमंग भरली वांगी (Bharli Vangi recipe in Marathi)

दिवसभराच्या काबाड कष्टानंतर चुलीवरली गरमागरम बाजरीची भाकरी आणि मसाला भरून केलेली खमंग भरली वांगी हे  म्हणजे सर्व शेतकऱ्यांचे आवडते जेवण. शेतामध्ये सावलीला बसून भरली वांगी चवीने खाताना दुपारनंतरच्या कामाची शक्ती शेतकरी या नेहमीच्या पौष्टिक पदार्था मधून मिळवतो. महाराष्ट्राची अस्सल चव आणि कारभारनीच्या प्रेमाच्या घासाची पोहोच पावती म्हणजे भरली वांगी. आईने भरली वांगी केली आहेत हे फक्त खमंग सुवासाने चार शेजाऱ्यांना पटकन समजते. 

चला तर मग पाहुयात भरली वांगी रेसिपी कशी बनवावी

भरली वांगी बनविण्यासाठी लागणारे साहित्य :

हिरवी काटेरी वांगी - २५० ग्राम (छोट्या आकाराची )
शेंगदाणे - कप (भाजून बारीक पूड केलेले )
तीळ - चमचे (हलके भाजलेले )
लसूण - पाकळ्या (खलबत्यात बारीक ठेचून घ्यावा)
आले - छोटा तुकडा (खलबत्यात बारीक ठेचून घ्यावा)
कांदा - मध्यम आकाराचा (बारीक चिरलेला)
कोथिंबीर - / कप (बारीक चिरलेली )

Bharali Vangi Recipe in Marathi

टोमॅटो - (एकदम बारीक कापून घ्या)
लाल तिखट - ते छोटे चमचे (किंवा आवश्यकतेनुसार )
हळद - छोटा चमचा
धणेपूड - छोटा चमचा
जिरे - / छोटा चमचा
हिंग - चिमूटभर
तेल - मोठे चमचे
पाणी - कप
मीठ - चवीपुरते

भरली वांगी बनविण्याची कृती (Bharli Vangi recipe in Marathi) :


सर्वप्रथम वांगी चांगली धुऊन घ्यावीत, त्यांचे देठ शाबूत ठेऊन खालच्या बाजूने काप करावेत.  
नंतर कढई मध्ये तेल गरम करायला ठेवा .
तेल गरम झालेकी त्यात कांदा थोडा सोनेरी रंग होईपर्यंत परता .
आता त्यात जिरे , हळद , लाल तिखट, हिंग धणेपूड टाका थोडे परतून घ्या .
त्यात आता टोमॅटो आणि चवीपुरते मीठ टाकून थोडा वेळ  मिक्स करीत रहा .
आता गॅस बंद करा मिक्सर मध्ये शेंगदाणे , तीळ , आले , लसूण , कोथिंबीर आणि गॅसवर तयार केलेले मिश्रण चांगले बारीक करून घ्या .

Bharli Vangi Recipe in Marathi

तयार मिश्रण कापलेल्या वांग्यांच्या कपांमध्ये भरायला सुरवात करा .
पुन्हा त्याच कढई मध्ये थोडे तेल टाका, तेल गरम झाले कि थोडे ठेचलेला लसूण आणि जिरे टाकून परता .
आता त्यात भरलेली वांगी टाका पॅनला जरा हलवा जेणेकरून तेल सर्व वांग्यांना लागेल .
ते मिनिटे वांगी परतल्यानंतर त्यात पाणी घाला. १० ते १५ मिनिट शिजू द्या .
तुमची भरलेली वांगी तयार आहेत .

  • गरमा गरम भरली वांगी बाजरीच्या भाकरीसोबत खाणे हे महाराष्ट्रातील शेतकरी वर्गाचे आवडते कॉम्बिनेशन आहे.


भरली वांगी रेसिपी तयार केल्यानंतर आम्हाला चव कशी झाली हे कमेंट मध्ये सांगण्यास विसरू नका. रेसिपी आपणांस आवडली असेल तर मात्र शेअर करण्यास विसरू नका. 

No comments:

Post a Comment